मुपीकर
नमस्कार रसिक वाचक मित्र मैत्रिणींनो
मुपीकरचा मी सादर करत असलेला पहिला पण तसे पहायला गेलं तर तिसरा अंक सादर करायला अत्यंत आनंद होत आहे. आपले हे मासिक आपल्या सदस्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी काढावे ही संकल्पना प्रसाद ताम्हणकर अन अभिजीत थिटे यांची... काही कारणाने हे मासिक २ आवृत्यांनंतर अकाली बंद पडले. याच्या कारणांचा मागोवा घेण्याच्या भानगडीत पडायचे नाही. मध्यंतरी एका समूहाचे "अंतर्याम" हे दर्जेदार मासीक पाहण्यात आले. आणि "मुपीकर" चा पुनर्जन्म करण्याच्या विचारांना आणि कल्पनेला जोरदार चालना मिळाली. अन आता ते नव्याने सुरु करुन आपण आपल्या सदस्यांना एक हक्काचे व्यासपिठ मिळवुन देउन त्यांच्या कथा, लेख, कविता अन आपल्या समुहावर झालेली उत्तम चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हा या इ मासिकाचा प्रथम हेतु असेल.
तर आपल्या मुपीवरील सदस्यांच्या सक्रिय सहभागातून हा नव्या स्वरूपातला पहीला अंक सादर करताना अतिशय आनंद होत आहे. आपल्या सक्रिय सूचनांचे इथे स्वागतच आहे. आपण सर्व "मुपीकर" ला आपले बहुमोल साहित्य, सूचना सुधारणा सुचवून भरभरून प्रतिसाद देऊन हा उपक्रम यशवी कराल अशी आशा आहे.
या अंकाबद्दलची मते सूचना आपण "फ़ेसबुक" (लवकरच सुरु करत आहोत) वर "मुपीकर"च्या नव्याने सुरू होत असलेल्या मुक्तपीठ वरील धाग्यावरही देऊ शकाल.
अंक आपल्याला '' पिडीएफ " (PDF) फाईलच्या रुपात उपलब्ध करुन देण्यात येईल. हा अंक आपण दिलेल्या साईटवरुन डाउनलोड करुन घेउ शकता. तशी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. ज्यांना हा अंक मेल मधे हवा आहे त्यांनी आपले मेल आयडी [email protected] या मेल आयडी वर पाठवावेत. त्यानंतर हा अंक तुम्हाला इ मेल द्वारे पाठवण्यात येईल.
ह्या सर्व कामासाठी तुम्हा सदस्यांची देखील मदत मोलाची आहेच. अन ही मदत म्हणजे तुम्ही आम्हाला तुमचे साहित्य दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत पाठवायचे. तसेच या कामात मदतनीस पण हवे आहेतच. अशांनी पण आमच्याशी संपर्क साधा....
प्रसादने मागल्यावेळी साहित्य पाठवणार्यांसाठी काही मुद्दे / सुचना दिल्या होत्या त्याच परत इथे देते.
साहित्य पाठवणर्यांसाठी :-
१) साहित्य स्वतःचे असावे. कॉपी-पेस्ट केलेल अथवा इतरांचे साहित्य पाठवु नये.
२) लेख-कविता जे काही साहित्य तुम्ही पाठवाल ते देवनागरी लिपीतच पाठवावे.
३) एखाद्या लेखात आपण इतर कोणत्या लेखकाच्या काही वाक्यांचा / लेखनाचा आधार घेतला असल्यास तिथे तसा संदर्भ जरुर द्यावा.
४) लेखन मिळाल्याची कोणतीही पोच दिली जाणार नाही, तसेच हे लेखन आपण विनामानधन पाठवत आहात हे लक्षात घ्यावे.
५) सर्व लेखन योग्य शिर्षकासह व शक्य झाल्यास आपल्या संपर्क क्रमांकासह / इ-मेल सह [email protected] ह्या पत्त्यावर पाठवावे.
६) आपण पाठवलेल्या फ़ोटोना शिर्षक दिलेले असावे.
७) हा अंक सर्वांना मोफत उपलब्ध करुन देण्यात येईल.
८) खाद्य संस्कृती असा विभाग आपण लवकरच सुरु करत आहोत त्यासाठी योग्य ते साहित्य फ़ोटोसहीत द्यावे.
९) आपण आपल्या अंकात एक गेस्ट आर्टीकल ठेवणार आहोत. यात मुक्तपीठ बाहेरील सदस्याचे लेख/कविता/कथा सादर होतील...
प्रशासनाचा निर्णय हा अंतिम असेल त्याबद्दल वाद घालु नयेत.

mupipdf.pdf | |
File Size: | 321 kb |
File Type: |
mupikar2final.pdf | |
File Size: | 308 kb |
File Type: |
mupikar3.pdf | |
File Size: | 1257 kb |
File Type: |
Mupikar May 12 | |
File Size: | 2466 kb |
File Type: |
Mupikar June 12 | |
File Size: | 1536 kb |
File Type: |
mupikar_july12.pdf | |
File Size: | 2497 kb |
File Type: |
mupikar_aug.pdf | |
File Size: | 1778 kb |
File Type: |
mupikar_sept_12.pdf | |
File Size: | 1252 kb |
File Type: |